Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या70 टक्के इमारती वाहनतळांविना; वाहने रस्त्यावर

70 टक्के इमारती वाहनतळांविना; वाहने रस्त्यावर

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

70 टक्के इमारतींना वाहनतळ ( Parking )नसल्याने वाहन रस्त्याच्या कडेलाच उभी केली जातात.एकाच रस्त्यावर पादचार्‍यापासून अलिशान वाहने जातात.त्यामुळे कॉलेजरोड, येवलेकर मळा, कृषीनगर सायकल सर्कल, मॉडेल कॉलनी चौक, डिसूझा कॉलनी, गंगापूरपूरोडवरील( Gangapur Road ) शहीद सर्कल, प्रसाद सर्कल, रविवार कारंजा, ठक्कर बाजार आणि अशोक स्तंभ ही नाशिकमधील वाहतूक कोंडीची नेहमीचीच ठिकाणे झाली आहेत.

- Advertisement -

मॉडेल कॉलनीपासून डिसूझा कॉलनीमधून शहीद चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर तसेच कॉलेज रोडवरील कुलकर्णी सर्कलपासून तर कृषीनगर कॉर्नर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या चारचाकीं वाहनांमुळे वाहतुकीचा खेळंखंडोबा नेहमीच होत आहे.या दोन्ही रस्त्यांवर असलेले कॅफे, रेस्टॉरंट, चहा स्टॉल, चॅट भांडार, स्विटची दुकाने , शोरूमबाहेर थेट रस्त्यापर्यंत उभी राहणारी वाहने वाहतूक कोंडी भर घालत आहेत. या समस्येमुळे वाहन चालक एकमेकांना थोडा धक्का लागला तरी अनेक ठिकाणी वादविवादाचे प्रसंगही उदभवत आहेत.

यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करतात.त्यातच कोणत्याही दुकानासमोर दोन मिनीटेेही कोणी वाहन उभे करु देत नाही.या भागात वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असताना त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो.शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा,मेनरोड, सराफ बाजार या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्याचप्रमाणे या भागात मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे जुन्या यशवंत मंडईची इमारत पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी बहुमजली वाहन उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या संदर्भात महापालिकेत ठराव देखील झाला, मात्र बहुमजली वाहनतळाचे काम रखडल्याने रविवार कारंजा, मेनरोड व सराफ बाजार या भागातील व्यावसायिकांची अनेक वर्षांची मागणी प्रलंबित आहे.

कॉलेजरोडवर सकाळी बहुतांशी विद्यार्थ्यांचीच गर्दी असते.हे विद्यार्थी एवढे घाईत असतात की त्ंयांना सिग्नलचे भान नसते.सर्रास सिग्नल तोडून जातात.बिग बझार,कॉलेजरोड येथील सिग्नलवर पोलीस नसतात. त्यांचे लक्ष फक्त दंडाच्या पावतीवर असते. त्यामुळे बर्‍याचदा मोठ्या वाहनांना त्रास होतो. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते.

विनोद येवले

सीबीएस ते शालिमार दरम्यान एवढी बेशिस्त वाहतूक असते की स्वयंशिस्त कोठे दिसतच नाही.रिक्षाचालक तर अचानक प्रवासी घेण्यासाठी मध्येच थांबतात.तसेच बहुतांशी वाहने कडेला पार्क केलेली असतात.वाहनचालकंना स्वयंंशिस्त नाही व पोलीसही शिस्त लावण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळते.

अ‍ॅड. बाबासाहेब नन्नावरे

- Advertisment -

ताज्या बातम्या