Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंपूर्ण नाशिक विभागात ७ हजार कोटींचे पीक कर्ज वाटप

संपूर्ण नाशिक विभागात ७ हजार कोटींचे पीक कर्ज वाटप

नाशिक । प्रतिनिधी

खरीप हंगामासाठी विभागातील नाशिक, जळगांव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख २८ हजार ७०३ हेक्टर क्षेत्रासाठी ७ हजार १२३ कोटी पीक कर्जाचे वाटप झाले अाहे.

- Advertisement -

या पीक कर्जाचा लाभ विभागातील ७ लाख ७३ हजार ४३८ शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिली आहे.

खरीप हंगाम २०२० – २१ करिता विभागातील एकूण उद्दीष्टे ११ हजार १५१ कोटी २५ लाखाचे असून त्यापैकी ७ हजार १२३ कोटी पीक कर्जाचे वाटप झाले आहे. संपूर्ण विभागात आत्तापर्यंत ६३ टक्क्यापर्यंत कर्जवाटपाचे काम झाले आहे.

कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने ९३ टक्के इतके लक्षणीयअसे कर्जवाटप केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा २३ टक्के अधिक कर्जवाटप झाले असल्याची माहितीही लाठकर यांनी दिली.

खरीप पीक कर्ज वाटपात २ लाख ३७ हजार ९७२ नियमित कर्जदार शेतकऱ्यांना १ हजार ४१४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

तसेच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्त योजनेतील ३ लाख १९ हजार २५५ शेतकऱ्यांना १ हजार ५५५ कोटी ४१ लाखांचे कर्ज वाटप तर १७ हजार ९०१ नवीन सभासद झालेल्या शेतकऱ्यांना ६० कोटी ६३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या