नाशकात तीन दिवसांत सात टक्के पाऊस

नाशकात तीन दिवसांत सात टक्के पाऊस

नाशिक

नाशिक (nashik) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस (rain) सुरु आहे. यामुळे धरणसाठा वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील पावसाची(rain) टक्केवारी ५५ टक्के होती. त्यात शुक्रवारीपर्यंत सात टक्क्यांनी वाढ झाली. आता जिल्ह्यात सरासरीच्या ६३ टक्के पाऊस झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुुरु असलेल्या पावसामुळे सरासरी 63 टक्केपर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात सर्वत्र तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये आज दिवसभार पावसाने विश्रांती घेतली. पण ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला.

तालुकानिहाय पाऊस

नाशिकला 26. इगतपुरीत 43, दिंंडोरीत 33,पेठला 31, त्रंबकला 19.नांदगावला 74, कळवणला 60, बागलानला 30, सुरगाण्यात 46, देवळ्यात 33, निफाडला 22, सिन्नरला37, येवल्यात 37. चांदवड 13मिलीमिटर पावसाची नोंंद झाली. एकाच दिवशी 504 मिली मिटर पाऊस पडल्याने सरसरी पाऊस 63 ट्क्के झाला आहे.

या धरणातून पाणी सोडले

दारणातुन आजही 150 क्युसेक्स पाणी सोडले. नांदुर मध्यमेश्वमधुन1009, भावली धरणातुन 135, वालदेवीतुन 65, पाणी सोडले आहे. पालखेड मधून 391 क्यूसेस पाणी सोडले. हरणबारीतूनही 1643 क्यूसेस पाणी सोडले आहे. गंगापूर धरण 85 टक्के भरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com