Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedकार पुलावरुन कोसळली, आमदारपुत्रासह सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

कार पुलावरुन कोसळली, आमदारपुत्रासह सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

चारचाकी एक्सयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वर्ध्याजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू (Medical Studen) झाला आहे. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातातील मृतांमध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचाही समावेश आहे.

मालेगावच्या युवकाच्या उद्योगात ‘लेन्सकार्ट’चे सीईओ झाले भागिदार

- Advertisement -

देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळली. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या