Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशAccident News : भीषण अपघात! शाळेची बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू,...

Accident News : भीषण अपघात! शाळेची बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी बेपत्ता

दिल्ली | Delhi

उत्तराखंडच्या नैनीतालमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सुमारे ३२ प्रवासी घेऊन निघालेली हरियाणाची स्कूल बस काळाढुनगी रोडवरील नालनी येथे दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. नैनितालहून हरियाणात परतत असताना कालाढूंगी नैनिताल मार्गावर हा अपघात झाला.

- Advertisement -

Acciden News : भीषण अपघात! प्रवाशांसह बस ५० फूट दरीत कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील नैनितालच्या घटगडजवळ हा अपघात झाला. या अपघातात स्कूल बस खड्ड्यात पडली. जखमींना वाचवण्यात आले आणि त्यांना तात्काळ हल्दवानी आणि कालाढुंगी रुग्णालयात पाठवण्यात आले, ज्यामध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला, त्यानंतर माहिती मिळताच एसडीआरएफ पोलीस आणि एनडीआरएफसह स्थानिक लोकांनी मुलांना बाहेर काढलं.

अब जंग होगी! कंगनाच्या ‘Tejas’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

या बसमधील अनेक प्रवासी बेपत्ता असून, त्यांचा शोध एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याच कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सूटून हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. ज्या जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे, त्यापैकी अनेकजण हे गंभीर जखमी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॅनडामध्ये विमान कोसळलं! मुंबईच्या २ प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या