Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याहोर्डिंग्जमधून मनपाच्या तिजोरीत 7 कोटी

होर्डिंग्जमधून मनपाच्या तिजोरीत 7 कोटी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) विकासकामांसाठी पैशांची गरज असते. मात्र जकात व त्यानंतर एलबीटी (LBT) हद्दपार झाल्यामुळे महापालिकेने इतर उत्पन्नाचे स्त्रोत तयार करण्यावर भर दिला.

- Advertisement -

यामध्ये शहरात विविध ठिकाणी लागणार्‍या होर्डिंगच्या (Hoarding) माध्यमातून तब्बल 7 कोटींपेक्षा जास्त महसूल (revenue) मिळाला आहे. दरम्यान,अनधिकृत होर्डींग (Unauthorized hoarding) लावल्याप्रकरणी महापालिकेकडून सात जणांवर गुन्हे दाखल झाले आहे.

विविध प्रकारचे होर्डिग्ज (Hoarding), पोस्टर (poster) लावण्यासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी (permission) घ्यावी लागते. तर महापालिकेला फलक लावण्यासाठी शुल्क आकारून परवानगी देते. 1 फेब्रुवारी 2019 ते 20 मे 2022 या काळात होर्डिग्जच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला तब्बल 7 कोटी 23 लाख 63 हजार रुपयांचा महसूल (revenue) मिळाला आहे. दरम्यान शहरातील सहाही विभागात 14 हजार 355 होर्डिग्ज, पोस्टर, स्टिकर्सच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाले आहेत.

नाशिकरोड (nashik road), सातपूर (satpur), नवीन नाशिक (navin nashik), पंचवटी (panchavati), पश्चिम व पूर्व या सहा विभागात लागलेल्या होर्डिग्जच्या माध्यमातून पालिकेला हे उत्पन्न मिळाले आहे. परवानगी न घेता होर्डिग्ज पालिका जप्त करुन घेते. जाहिरात कराच्या माध्यमातून सर्वाधिक 7 कोटी 16 लाखाचा महसूल मिळाला आहे.

तर खाजगी जागेवरील परवाना शुल्कसाठी 3 लाख 93 हजार आणि पालिकेच्या जागेवरील लायसेन्स फी (License fee) साठी 3 लाख 10 हजार याप्रमाणे एकूण होर्डिग्जच्या रुपात उत्पन्न मिळाले आहे. सध्या शहरातील मुख्य चौक परिसर, महत्वाचे सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक तसेच राजकीय होर्डिग्ज लावलेले दिसतात.

या होर्डिग्जपोटी पालिकेला शुल्क मिळत असते. नाशिक शहराची लोकसंख्या मागील काही वर्षापासून झपाट्याने वाढत आहे. शहराची हद्द वाढण्याबरोबर बांधकाम क्षेत्र वाढत आहे. त्यातुनच बांधकाम व्यावसायिकांसह हॉटेल, कापड यासह विविध व्यावसायिक शहरातील महत्वाच्या ठिकाणी आपल्या संस्थेची, दुकानाची जाहिरात व्हावी, यासाठी प्राधान्य देतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या