Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. विकी कौशलचा सरदार उधम सिंह सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट तर सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ हा मराठी सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

- Advertisement -

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटासाठी अल्लू अर्जुन याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी अलिया भट आणि ममिमीफ या चित्रपटासाठी क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तर चंद्रकांत कुलकर्णी निर्मित आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘चंद सासें’ या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट हा पुरस्कार घोषित झाला आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला बेस्ट नरगिस दत्त अवार्ड फॉर बेस्ट फिल्म ऑन नॅशनल इंटीग्रेशन पुरस्कार घोषित झाला आहे. शेखर बापू रणखांबे यांच्या रेखा या चित्रपटाला सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अन्य पुरस्कार

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी-आरआरआर- तेलुगू

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर-तेलुगू

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा / आरआरआर सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी

सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझायनर – सरकार उधम सिंग

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरकार उधम सिंग

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – सरकार उधम सिंग

- Advertisment -

ताज्या बातम्या