नाशिकमध्ये साडेतीन वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान

नाशिकमध्ये साडेतीन वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान

नाशिक । प्रतिनिधी

आज नाशिकमध्ये ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तब्ब्ल ६८. टक्के मतदान झाले. ग्रामीण किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले...

जिल्ह्यात आज एकूण ५६५ ग्रामपंचायतींची मतदान सुरु आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी प्रमाणात होती. मात्र, दुपारनंतर टक्का वाढलेला बघायला मिळाला.

जिल्ह्यात एकूण १० लाख ९६ हजार १६२ मतदार असून त्यापैकी आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७ लाख ५३ हजार २८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नाशिक तालुक्यात एकूण २२ ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये ७२.०३ मतदान झाले

त्र्यंबकमध्ये ३ ग्रामपंचायती आहेत तिथे ८५. ११ टक्के मतदान झाले

दिंडोरीत ५३ ग्रामपंचायती आहेत तिथे ७९.४४ टक्के मतदान झाले

इगतपुरीत ०७ ग्रामपंचायती आहेत तिथे ८०.२५ टक्के मतदान झाले

निफाडमध्ये ६० ग्रामपंचायती आहेत तिथे ६३.३५ टक्के मतदान झाले

सिन्नर मध्ये ९० ग्रामपंचायती आहेत तिथे ७३. १९ टक्के मतदान झाले

येवला येथे ६१ ग्रामपंचायती आहेत तिथे ७२.४३ टक्के मतदान झाले

मालेगावमध्ये ९६ ग्रामपंचायती आहेत तिथे ६६. ६८ टक्के मतदान झाले

नांदगावमध्ये ५४ ग्रामपंचायती आहेत तिथे ६४.८२ टक्के मतदान झाले

चांदवडमध्ये ५२ ग्रामपंचायती आहेत ७४.२० टक्के मतदान झाले

कळवण तालुक्यात २७ ग्रामपंचायती आहेत तिथे ७३.७४ टक्के मतदान झाले

बागलाण तालुक्यात ३१ ग्रामपंचायती आहेत तिथे ५४.७० टक्के मतदान झाले

देवळयात एकूण ९ ग्रामपंचायती आहेत तिथे ७३.३४ टक्के मतदान झाले

असे ऐकवून ५६५ ग्रामपंचायतीत ६८.८७ टक्के मतदान झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com