Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकच्या ६६ वनाधिकाऱ्यांची दिली परीक्षा

नाशिकच्या ६६ वनाधिकाऱ्यांची दिली परीक्षा

नाशिक : प्रतिनिधी

वनविभागाच्या खात्याअंतर्गत अधिकाऱ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. शनिवारी (दि. ९) व रविवारी (दि. १०) अशा सलग दोन दिवस शहरातील वाघ गुरुजी शाळेत परीक्षेचे आयोजन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आले होते.

- Advertisement -

नाशिक विभागातील ६६ वनपरिक्षेत्र अधिकारी, तर राज्यातून दोनशेपेक्षा जास्त वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविष्ठ झाले होते.

वन खात्यात केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (आयएफएस) व राज्य लोकसेवा आयोगामार्फत थेट सेवेत दाखल झालेले उपवनसंरक्षक ते वनक्षेत्रपाल (आरएफओ) दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढीसाठी वनखात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते.

ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक परिक्षार्थीला चार संधी दिल्या जातात. यंदाच्या वर्षी या परीक्षेचे नियाेजन वनविभागाकडे सोपविण्यात आले होते. संपूर्ण परीक्षा इन कॅमेरा झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘जमीन महसूल व गुन्हेगारी कायदे’, ‘वन कायदे’ आणि राज्य वन मार्गदर्शिका नियमावलीवर आधारित प्रोसिजर व अकाउंट आदी विषयांवर आधारित दीडशे गुणांचे तीन पेपर घेण्यात आले आहे. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ७५ गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. पेपर सोडविण्यासाठी परीक्षार्थींना प्रत्येकी एक तासाची वेळ देण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या