Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या६५ वर्षांच्या आजींची चपळाई; कोसळणाऱ्या विजेला चकविले!

६५ वर्षांच्या आजींची चपळाई; कोसळणाऱ्या विजेला चकविले!

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे Trimbakeshwar

देव तारी त्याला कोण मारी ? याचं आजीच्या अंगी विजे इतकी चपळाई असल्याने आजीने कोसळणाऱ्या विजेला चकविले ! वीज आंब्याच्या झाडावर पडली. थोडक्यात आजी आणि आंब्याच्या झाडावर विजेची विभागणी झाली.

- Advertisement -

त्र्यंबक पंचक्रोशितील ग्रामस्थांना याचा प्रत्यय आला.डोक्यावर वीज कोसळूनही आजी सलामत आहे . या घटनेची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलले आहे. त्यामुळेच अवकाळी पाऊस, वीजांचा कडकडाट, गारपीटअसे वातावरण आहे.

शुक्रवारी सायंकाळी पिंपळद शिवारात पाऊस सुरू असताना तान्हाबाई पुंडलिक पोटिंदे (वय ६५ वर्षे) या आजी शेतात होत्या. लाकडे भीजू नये म्हणून ती गोळा करून झाकण्यासाठी त्या शेतातीलच घराबाहेर आल्या.त्याचक्षणी तान्हाबाईंच्या डोक्यावरून वीज गेली आणि शेजारीच असलेल्या आंब्याच्या झाडावर कोसळली.

वीज कोसळत असतानाच आजीबाईला स्ट्राइक झाल्याने संकटाचे चाहूल लागल्याने आजी सावध होवून माघारी वळत असतानाच वीज डोक्यावरून गेल्याने आजीचे केस आणि अंगावरील लुगडे जळाले.विज आंब्याच्या झाडावर कोसळली. यादुर्घटनेत त्या बेशुद्ध झाल्या.

आपली आई बेशुद्ध झाल्याचे पाहून मुलगा सोनू याने तात्काळ त्र्यंबकेश्वर येथील माऊली हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर डॉ. पंकज बोरसे यांनी उपचार केले. आजीची प्रकृती आता स्थिर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या