कराेना
कराेना
मुख्य बातम्या

देशात ६४ टक्के रुग्ण बरे

दिवसभरात ७०५ जणांचा मृत्यू

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली

देशातील कराेना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना दिलासादायक बातमी समाेर आली आहे. देशात २४ तासांत तब्बल ४८ हजार ६६१ नवीन रुग्ण सापडले. तसेच ७०५ जणांचा मृत्यू झाला. मात्र २४ तासांत ६४ टक्के रुग्ण बरे झालेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार झाली आहे. यातील ४ लाख ६७ हजार रुग्ण सक्रीय आहेत. तर, ८ लाख ८५ हजार रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे

राज्यात ९ हजार रुग्ण

देशभरासह राज्यात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात तब्बल ९ हजार ४३१ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, २६७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ३ लाख ७५ हजार ७९९ वर पोहचली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com