Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये २४ तासांत ६३६ 'पॉझिटिव्ह'

नाशिकमध्ये २४ तासांत ६३६ ‘पॉझिटिव्ह’

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्हात करोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात सर्वाधिक प्रमाण असून मागील 24 तासात जिल्ह्यात 636 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्ताचा आकडा 17 हजार 707 इतका झाला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील विक्रमी 528 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 12 हजार 812 वर पोहचला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 636 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

यामध्ये नाशिक शहरातील 474 रूग्ण आहेत. यात शहरातील नवीन नाशिक, नाशिकरोड, पंचवटी, सातपुर गाव, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 12 हजार 39 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 111 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 4 हजार 84 झाला आहे.

यामध्ये सर्वाधिक येवला, इगतपुरी, सिन्नर, सुरगाणा, इगतपुरी, नांदगाव, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगावत आज 50 रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 419 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 165 झाला आहे.

करोनामुळे आज दिवसभरात केवळ 2 जणांचा मत्यू झाला. यामध्ये दोघेही नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 547 झाला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा मात्र वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने 1 हजार 75 संशित रूग्ण दाखल झाले आहेत.

यामध्ये शहरातील सर्वाधिक 709 तर ग्रामिण जिल्ह्यातील 203 आहेत. जिल्हा रूग्णालय 7, मालेगाव 36, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 16 व होम कोरोंटाईन 107 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण कोरोना बाधित: 17,707

नाशिक : 12039

मालेगाव : 1419

उर्वरित जिल्हा : 4084

जिल्हा बाह्य ः 165

एकूण मृत्यू: 547

करोनामुक्त : 12812

- Advertisment -

ताज्या बातम्या