मुख्यमंत्री निधीत 606 कोटींचा निधी वापराविना शिल्लक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री निधीत 606 कोटींचा निधी वापराविना शिल्लक

कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (Chief Ministers Relief Fund) मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यात 799 कोटी रक्कम जमा झाली असून 606 कोटींचा निधी वापराविना शिल्लक राहिला आहे. म्हणजेच यातील फक्त 25 टक्के निधी वापरण्यात आला आहे, हीमाहिती आरटीआय अर्जातून समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. त्यावर मुख्यमंत्री सचिवालयाने आतापर्यंत किती निधी जमा झाला आणि किती वापरण्यात आला याबद्दल माहिती दिली आहे. आतापर्यंत एकूण 798 कोटी रक्कम जमा झाली असून आजमितीस 606 कोटी रक्कम शिल्लक आहे. 192 कोटीचे वाटप केले आहे. 192 कोटीचे वाटप लक्षात घेता एकूण 25 टक्के रक्कम ही जमा निधीतून खर्च करण्यात आली आहे.

हा निधी फक्त कोविडसाठी

अनिल गलगली यांच्या मते हा निधी फक्त कोविडसाठी होता. यामुळे आतापर्यंत संपुर्ण निधी खर्च करणे आवश्यक होते. पण शासनाने खर्च केला नाही. हा निधी राखीव ठेवण्याचे नेमके प्रयोजन काय आहे? याची माहिती जनतेस देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही गलगलींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com