राज्यात 6 हजार 497 नवे करोना रुग्ण, 193 मृत्यू

राज्यात 6 हजार 497 नवे करोना रुग्ण, 193 मृत्यू

गेल्या 24 तासांत 4 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 497 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 193 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 60 हजार 924 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 182 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 60 हजार 924 रुग्णांपैकी 1 लाख 44 हजार 507 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1 लाख 5 हजार 637 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन 10 हजार 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

तर महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 55.38 टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील मृत्यू दर 4.2 टक्के झाला आहे. आत्तापर्यंत 13 लाख 42 हजार 792 नमुन्यांपैकी 2 लाख 60 हजार 924 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 6 लाख 87 हजार 353 लोक होम क्वारंटाइन आहेत. तर 41 हजार 660 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 5 हजार 637 केसेस अ‍ॅक्टिव्ह आहेत असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com