Nepal Earthquake : नेपाळमध्ये विनाशकारी भूकंप! १२९ जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

Nepal Earthquake : नेपाळमध्ये विनाशकारी भूकंप! १२९ जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

दिल्ली | Delhi

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळ पुन्हा एकदा भुकंपाने हादरला आहे. शुक्रवारी मध्यरात्री नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. यामध्ये शेकडो इमारतींची पडझड झाली असून घटनेत आतापर्यंत १२९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील अयोध्येपासून सुमारे २२७ किमी उत्तरेस आणि काठमांडूपासून ३३१ किमी पश्चिम उत्तर-पश्चिम १० किमी खोलीवर होता. नेपाळला महिनाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान, दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक बाहेर आले.

उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांशिवाय बिहारमधील कटिहार, मोतिहारी आणि पटना इथंही भूकंपाचे धक्के जाणवले.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com