Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशहेलिकॉप्टरचा अपघात ; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

हेलिकॉप्टरचा अपघात ; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

काठमांडू | Kathmandu

संपूर्ण जगाचे मन सुन्न करणारी घटना नेपाळमध्ये (Nepal Helicopter Crash) घडली असून, इथे एका हेलिकॉप्टरचा अपघात होऊन ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी ६ प्रवाशांना घेऊन निघालेले हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आणि आता त्याचे अपघातग्रस्त अवशेष हाती लागल्याची माहिती संबंधित यंत्रणांनी प्रसिद्ध केली आहे.

- Advertisement -

अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर सोलुखुंबूहून काठमांडूला (Kathmandu) जात होते आणि सकाळी १० वाजता कंट्रोल टॉवरशी (Control Tower Lost Signal) संपर्क तुटला. स्थानिक वेळेनुसार दहा वाजून बारा मिनिटांनी हेलिकॉप्टर निघाले होते.

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, बेपत्ता हेलिकॉप्टरचा सकाळी सव्वा दहा वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Tribhuvan International Airport) महाव्यवस्थापक प्रताप बाबू तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल साइन 9N-AMV असलेले हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर १५ मिनिटांनी संपर्काबाहेर गेले.

हेलिकॉप्टरमधून एकूण ६ जण प्रवास करत होते. हे सहाजण मेक्सिकन असल्याचं सांगण्यात येत असून, त्यांच्यापैकी पाचजणांचे मृतदेह सध्या सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिखु पीके ग्राम परिषद आणि दुधकुंडा नगर पालिका-2 यांच्या सीमाभागात या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले.

राजकीय वर्तुळात खळबळ! छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ धनजंय मुंडेंनाही धमकीचा फोन

दरम्यान, या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला हे अद्याप समजले नसून तपास यंत्रणा आणि पोलिसांनी कयास लावत पर्वतशिखर किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाशी आदळल्यामुळे हा अपघात झालेला असू शकतो. या अपघातातील मरण पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असले तरीही त्यांची ओळख मात्र अद्यापाही पटलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या