ITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून ६ जवान शहीद

ITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून ६ जवान शहीद

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये ITBP च्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे.

या अपघातात ६ जवान शहीद झाले आहेत तर अनेक जवान जखमी झाले आहेत. त्यांना एअरलिफ्ट करून श्रीनगर आर्मी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. पुढील बचावकार्य सुरू आहे.

आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस चंदनवाडीहून पहलगामला जात होती. त्यानंतर बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस दरीमध्ये पडली. या बसमध्ये ३९ जवान होते. त्यापैकी ३७ जवान ITBP चे होते, तर २ जम्मू-काश्मीर पोलिसांचे होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com