बनावट कागदपत्रं तयार करून महिलेची सहा कोटींची फसवणूक

बनावट कागदपत्रं तयार करून महिलेची सहा कोटींची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बनावट कागदपत्रं (fake documents) तयार करत मालमत्ताधारक महिलेची खोटी सही करून तिच्या मिळकतीवर संगनमताने बोजा चढवून सहा कोटी रुपयांचे कर्ज काढत फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी बबली अमित सिंग (५२, रा. नाशिक) ह्या  सध्या भोपाळ (Bhopal) येथील श्रीपुरम् येथे राहतात. (दि. २८ फेब्रुवारी २०१२ ते दि. २८ फेब्रुवारी २०१३)  संशयित आनंदकुमार सिंग (४४), प्रीती आनंदकुमार सिंग (४२) व त्यांचा एक साथीदार संजय प्रभाकर भडके (५१, नाशिक) यांनी संगनमत करून बबली सिंग यांचा बनावट दस्त तयार केला.

त्यानंतर आरोपी आनंदकुमार सिंग, प्रीती सिंग व संजय भडके यांनी संगनमत करून या मिळकतीवर बोजा चढवून ही मिळकत विवादित केली. त्यानंतर यात फिर्यादी महिलेची सुमारे सहा कोटी रुपयांची मिळकत बळकावून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मगर करीत आहेत.

तिघा संशयितांनी त्यांचा विश्‍वास संपादन करून त्यांच्याशी जवळीक निर्माण केली.  तिघा संशयितांनी  मिळून फिर्यादी (FIR) बबली सिंग यांच्याऐवजी आनंदकुमार सिंग याने त्याची पत्नी प्रीती सिंग हिला बबली सिंग आहे असे भासवून त्यांची मुखत्यारपत्रावर खोटी सही करून घेतली. त्यानंतर त्यांचा साथीदार संजय भडके याच्या मदतीने खोट्या सह्या करून पूर्वनियोजित कटकारस्थान करून सदरची मिळकत बळकावून गिळंकृत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com