Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याअमेरिकेतील ५ जीमुळे विमानांना धोका; एअर इंडियाची २० विमाने रद्द

अमेरिकेतील ५ जीमुळे विमानांना धोका; एअर इंडियाची २० विमाने रद्द

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कालपासून अमेरिकेच्या विमानतळांवर (US airports) ५ जी (5 G) इंटरनेट सुविधा सुरु झाली आहे. ही सेवा धोकादायक असल्याचे याआधीच सांगण्यात आले आहे. ५ जीच्या वेव्हचा विमानांच्या यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेने (America) व्यक्त केली आहे. यामुळे एअर इंडियाने बुधवार व गुरुवार मिळून २० विमाने रद्द केली.

- Advertisement -

यामुळेच अमेरिकेकडे जाणारी विमाने (Air Plane) जगातील अनेक विमान कंपन्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काल एअरइंडियानेदेखील (Air India) १४ विमाने रद्द केली. तसेच इमिरेट्स, ऑल निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाईननेदेखील विमाने रद्द केली आहेत.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

विमानाच्या रेडिओ अल्टिमीटरमध्ये ५ जीच्या हस्तक्षेपामुळे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टमला लँडिंग मोडमध्ये जाण्यापासून रोखले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे विमानाला धावपट्टीवर थांबणे अशक्य होऊ शकते.

उंचीमापक जमिनीपासून विमानाची उंची मोजतो. अल्टिमीटर ज्या बँडवर काम करतो तो आणि ५ जी सिस्टीम ज्या बँडवर काम करते ती जवळपास सारखीच आहे. यामुळे ५ जी सेवा विमानांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे यूएस एव्हिएशन रेग्युलेटर फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने नमूद केले आहे.

Photo Gallery : आता नाशिकमध्ये घेता येईल केदारनाथचे दर्शन

अमेरिकेत ५ जी चालू केल्याने आठ भारत-यूएस (Indo-US) उड्डाणे रद्द केली जात आहेत. एअर इंडियाची आठ उड्डाणे आहेत. दिल्ली-न्यूयॉर्क, न्यूयॉर्क-दिल्ली, दिल्ली-शिकागो, शिकागो-दिल्ली, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली, दिल्ली-नेवार्क आणि नेवार्क-दिल्ली अशी विमाने आहेत. गुरुवारी ऑपरेट होणारी एकूण सहा इंडो-यूएस उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने ट्विटरवर दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या