नाशिक शहरात दोन दिवसात ५७४ नवीन रुग्ण आढळले

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

जुलै महिन्याच्या 19 तारखेपर्यत नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा आकडा 5 हजाराच्यावर गेला असुन वेगाने वाढत असलेल्या रुग्णांमुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. शहरात गेल्या दोन दिवसात तब्बल 574 नवीन रुग्ण वाढले आहे.

नवीन रुग्णांच्या संपर्कातील संशयित असलेले 3 हजारावरील नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात जुलै महिन्यात प्रति दिन बाधीतांचा आकडा 185 आसपास नवीन रुग्णांची भर पडत आहे. तसेच मृतांचा आकडा 200 च्यावर गेल्याने शहरात गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

फक्त जुन महिन्यात शहरातील करोना रुग्णांचा आकडा 2 हजारापर्यत जाऊन पोहचला होता. यावेळी रुग्णांचा वाढता वेग लक्षात घेत शासनाकडुन नाशिक शहरात जुलै महिन्यात रुग्णांचा आकडा दुप्पट म्हणजे चार हजारापर्यत जाईल अशी भिती व्यक्त आली होती.

प्रत्यक्ष जुलै महिन्यातील नवीन रुग्णांचा वेग प्रचंड वाढला असुन दीडशे ते पाऊणे दोनशे रुग्णांची भर पडत गेली आहे. आता तर हा वेग प्रतिदीन 185 च्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे केवळ जुलै महिन्याच्या 18 दिवसात 3 हजार 334 नवीन रुग्णांची भर पडली असुन परिणामी आता रुग्णांचा आकडा 5444 पर्यत जाऊन पोहचला आहे.

या वाढत्या संसर्गामुळे महापालिका व आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ वाढली आहे. शुक्रवारी (दि.17) रोजी 403 आणि शनिवारी (दि.18) रोजी 171 अशी दोन दिवसात 574 नवीन रुग्ण वाढले असुन मृतांचा आकडा 202 पर्यत गेला आहे.

दोन दिवसात नऊ जणांचा मृत्यु झाला आहे. नवीन रुग्णांची वाढता वेग लक्षात आता करोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाकडुन कडक उपाय योजना सुरू केल्या आहे.

तसेच आत्तापर्यत शहरात 3 हजार 575 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यात शनिवारी शहरात 84 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात वाढलेल्या नवीन रुग्णांमुळे शुक्रवारी 1131 व शनिवारी 1880 अशा 3 हजार 10 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यातत आले आहे.

गेल्या नोद दिवसात 9 जणांचा करोनाने मृत्यु झाला आहे. यात 73 वर्षीय पुरुष रा. राज व्हिला, अंबिंकानगर नाशिक, 59 वर्षाचा पुरुष रा.जुनी तांबट लेन जुने नाशिक, 68 वर्षाचा पुरुष रा. पंचवटी, 67 वर्षाचा पुरुष रा. विजय निवास कालिका पार्क उंटवाडी, 45 वर्षाचा पुरुष रा. शामस्तव रोहाऊस विखेपाटीलनगर, 45 वर्षीय पुरुष रा. देवळालीगांव, 63 वर्षीय पुरुष रा. म्हसरुळ, 57 वर्षीय महिला रा. लोखंडे मळा कॅनाल रोड व 31 वर्षीय पुरुष रो./ पाथर्डी शिवार नाशिक यांचा समावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *