Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या‘देशदूत’ चा उद्या 53 वा वर्धापन दिन; गुणवंतांचा गौरव करण्याची परंपरा यंदाही...

‘देशदूत’ चा उद्या 53 वा वर्धापन दिन; गुणवंतांचा गौरव करण्याची परंपरा यंदाही कायम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उद्या 4 सप्टेंबर 2022 रोजी ‘देशदूत’ 53 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील गुणवंतांचा गौरव करण्याची परंपरा यंदाही कायम आहे. 4 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता प.सा.सायिखेडकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनन्ट कर्नल(नि) मनोजकुमार सिन्हा ( Lt. Col( Ret). Manoj Kumar Sinha) आणि ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम (Senior actor Shivaji Satam) हे उपस्थित राहाणार आहेत.

वर्धापनदिनानिमित्त समाजातील गुणवंतांचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करणे ही ‘देशदूत’ची जुनी परंपरा. ही कल्पना तात्यासाहेब शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांनी मांडली होती. तो वसा ‘देशदूत’ने आजतागायत सांभाळला आहे.

गुणवंतांची निवड करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा आणि ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. मेधा सायखेडकर यांनी समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.

निवड समितीने निवड केलेले गुणवंत आणि त्यांचे क्षेत्र पुढीलप्रमाणे.

1) दिनेश पागी, क्षेत्र : क्रीडाशिक्षक

2) निकिता काळे, क्षेत्र : क्रीडापटू

3) तनिषा कोटेचा, क्षेत्र : क्रीडापटू

4) वैभव भोगले, क्षेत्र : पर्यावरण, वन्यजीव

5) सनय फाऊंडेशन, क्षेत्र : सामाजिक कार्य-संस्था

6) रोहित जाधव, क्षेत्र : सामाजिक कार्य

7) स्ट्रॉबेरी स्वयंसहाय्यता गट, बोरगाव, क्षेत्र : महिला सक्षमीकरण

8) राजेंद्र बागवे, क्षेत्र : उद्योजक, मेंटॉर

9) विश्वजित मोरे, क्षेत्र : नवउद्योजक

10) खंडू मोरे, संजय गुंजाळ, क्षेत्र : उपक्रमशील शिक्षक

11) केशव गावित, क्षेत्र : उपक्रमशील शिक्षक

12) डॉ. अरुणा पाटील, क्षेत्र : आरोग्य

13) स्वानंद बेदरकर, क्षेत्र : साहित्य

14) अमोल जागले, क्षेत्र : विशेष कर्तृत्व

15) आम्रपाली पगारे, क्षेत्र : विशेष कर्तृत्व

16) माधवराव बर्वे, क्षेत्र : कृषी : जीवन मिशन

- Advertisment -

ताज्या बातम्या