५० वर्षीय लष्करी अधिकाऱ्याचा विश्वविक्रम

धावती जिप्सी, २० फूट उंच शिडीवर केले एक तास तेरा मिनिट शीर्षासन
५० वर्षीय लष्करी अधिकाऱ्याचा विश्वविक्रम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय तोफखाना केंद्राचे 50 वर्षीय लेफ्टनंट कर्नल लक्ष्मी धार भुयान (laxmi dhar bhuyan) यांनी चालत्या जिप्सीवर आणि वीस फूट उंच शिडीवर शीर्षासन (Shirshasana) योग मुद्रेत पराक्रम केला....

सुमारे एक तास तेरा मिनिटे त्यांनी शीर्षासन करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह (Guinness Book of World Records) एशिया बुक (Asia Book), इंडिया बुक (India Book), लिम्का बुक (Limca Book), अमेरिका बुक ऑफ रिकॉर्डमध्ये (America Book of Records) नोंद त्यांची झाली आहे.

ऑन व्हील प्रथमच तासभर शीर्षासन योग मुद्रेत मैदानाला फेरी मारणारे भुयान हे प्रथमच योगपटू ठरले आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती. यामुळे त्यांना 20 टक्क्यांनी अपंगत्व आले आहे.

ते उत्कृष्ट व्यायामपटू धावपटू, योगापटू असून दुर्दम्य इच्छाशक्ती आणि देशभक्तीच्या सळसळत्या उत्साहच्या बळावर त्यांनी अपंगत्वावर मात केली आहे.

नाशिक (Nashik) येथील भारतीय तोफखाना केंद्रातील (Indian Artillery Center) ज्ञानी स्टेडियम येथील मैदानावर हा अनोखा जागतिक विक्रम केला.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) औचित्यावर भुयान यांनी या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सोहळ्याला नाशिकचे प्रधान मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, सत्र न्यायाधीश डी. डी. कर्वे, एम. एस. बोराडे, आर्टिलरी सेंटरचे कमांडन्ट ब्रिगेडियर ए. राजेश उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com