नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार; ६० पदाधिकाऱ्यांसह १०० जणांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार; ६०  पदाधिकाऱ्यांसह १०० जणांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाला (Thackeray Sena) नाशिकमध्ये (Nashik) आणखी एक धक्का बसला आहे. सुमारे पन्नास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संजय राऊत (sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर येत असताना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे...

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. नाशिकचे जवळपास ६० पदाधिकाऱ्यांसह १०० जणांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यात विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार; ६०  पदाधिकाऱ्यांसह १०० जणांचा शिंदे गटात प्रवेश
अपहरण केलेला मुलगा सुखरूप परतला घरी; नेमकं काय घडलं?

संजय राऊत आज दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या आधीही राऊतांची पाठ फिरताच 12 माजी नगरसेविकांनी शिंदें गटात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर सभा होणार मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे.

त्यामुळे नाशकातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटातील मोठा गट फोडण्यात शिंदे गटाला अखेर यश आल्याचे म्हटले जात आहे.

आज नाशिक ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी पूर्व विधानसभा प्रमुख योगेश बेलदार, शहर संघटक अनिल साळुंखे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना महाराष्ट्र उपसचिव बापू लहूजी ताकाटे, नाशिक रोड शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे, उप महानगर प्रमुख योगेश चव्हाणके, अमोल सूर्यवंशी, प्रमोद लासुरे, युवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमुख रुपेश पालकर युवसेना नाशिक जिल्हा सरचिटणीस संदेश लवटे, विभाग प्रमुख नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहांके, विनोद नुनसे, शैलेश कार्ले, प्रसन्ना तांबट, अमेय जाधव, सहाय्यक संपर्क प्रमुख पच्छिम विधानसभा, महासचिव विश्व ब्राम्हण महापरिषद ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख महेश जोशी, उप विभाग प्रमुख राहुल देशमुख, प्रशांत गाडगीळ, प्रशांत निचल, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गीते, महेश लोखंडे, प्रमोद काशेकर, योगेश धामणस्कर, युवसेना महानगर संघटक गोकुळ मते, युवसेना उप महानगर प्रमुख, पोलीस बॉइज संघटना जिल्हा अध्यक्ष विशाल खैरनार, युवसेना पूर्व विधानसभा प्रसिध्द प्रमुख अंकुश बोचरे, युवसेना शहर समन्वयक आकाश काळे, युवसेना विस्तारक सोशल मिडिया राकेश झोरे, युवसेना विभाग प्रमुख मोहित पन्हाळे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, शाखाप्रमुख गणेश परदेशी, राहुल रंधे, अमोल वराडे, अनिल निरभवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर, आनंद गटकळ, धीरज कडाळे, महाराष्ट्र शिव वाहतुक सेनाचे महाराष्ट्रराज्य सचिव लक्षुमण (नाना) पाटील, नाशिकशहर अध्यक्ष मनोज ऊदावंत, नाशिकजिल्हा प्रमुख आनिल नागरे, नाशिकजिल्हा उपअध्यक्ष संदिप कदम, नाशिकजिल्हा प्रसीध्दीप्रमुख रविद्र पेहेरकर, सिन्नरतालुका अध्यक्ष पंकज भालेराव, सिन्नरतालुका उपअध्यक्ष आनिल शिंदे, नाशिकरोड अध्यक्ष उमेश सोनार, नाशिकजिल्हा उपअध्यक्ष संजय गवळी, उपजिल्हाध्यक्ष ग्रामीण योगेश सावकार, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभिजीत तागड यांनी राजू आण्णा लवटे व अजय बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला.

या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेत उचित सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिले असून नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे आदेशित केले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेत नाशिकचे आणखी प्रवेश होणार असून यात नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती राजू लवटे व अजय बोरस्ते यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com