चांदोरीनंतर सायखेड्यात ५० लाखांचे अवैध मद्य जप्त

jalgaon-digital
3 Min Read

निफाड। प्रतिनिधी Nashik

चांदोरी (Chandori) येथील एका लॉन्सवर बनावट देशी दारूचा कारखाना उद्धवस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच उत्पादन शुल्क विभागाने सायखेडा चौफूलीवर एका दुकानात अशीच कारवाई करीत सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान कारवाई झालेले दोन्ही कारखाने हे एकाच मालकाचे असून ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाई दरम्यान ताब्यात घेतले आहे….

नाशिक-औरंगाबाद रोडवर (Nashik Aurangabad Road) चांदोरी (Chandori) जवळ असलेल्या अंबादास खरात यांच्या उदयराज लॉन्स (Udayanraj Lawns) येथे सोमवारी रात्री बनावट दारूच्या कारखान्यावर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nahsik SP Sachin Patil) यांनी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत यात सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 12 आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.

यावेळी या लॉन्सवर बनावट देशीदारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स तसेच अंदाजे 10 ते 15 हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लिटर स्पिरीट, 200 लिटर चे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे 5 ते 10 हजार, देशी दारू बनविण्याचे साहित्य, 5 पाण्याच्या टाक्या, एक मालट्रक असा एकुण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला होता.

या छाप्याप्रसंगी घटनास्थळी संजय मल्हारी दाते (वय 47) रा. गोंदेगाव, ता.निफाड हे मिळून आले. तसेच ही बनावट दारू तयार करणारे 8 ते 9 मजूर हे परप्रांतीय असून ते बाहेर जावू नये याची पूर्ण खबरदारी घेतली जात असे. तसेच येथे बनविण्यात येणारी बनावट दारू ही ट्रकमधून बाहेर पाठविली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यामुळे पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली असून याप्रकरणी सायखेडा पोलीस स्टेशनमध्येे गुन्हा दाखल झाला आहे. (Complaint Registerd at Saykheda police station) दरम्यान या घटनेला काही तास उलटत नाही तोच उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंजुळे यांनी सायखेडा चौफूलीवरील एका दुकानात छापा टाकत 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तर गेल्या तीन दिवसांपूर्वी सायखेडा परिसरातच ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) दोघा भावांकडून साडेसहा लाखांचा गुटखा जप्त करीत दोघांना अटक केली होती.

दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सायखेडा (Saykheda) येथील कॉलेज रोड परिसरातील ओम साई ट्रेडर्स (Om Sai Traders) दुकानासमोरील (एम.एच.15 एफ.एफ 8481) या वाहनाची तपासणी केली असता त्यात संदीप भादेकर यांच्या ताब्यातून 3 लाख 53 हजार 589 रुपयांचा तर मंगेश भादेकर याने पत्र्याच्या शेडमध्ये साठविलेला 3 लाख 5 हजार 60 रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

परिणामी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान अंमलदार कांबळे, गोतुरणे, देसले, वराडे, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून यापुढेही अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *