Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासप्टेंबरमध्ये होणार ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका

सप्टेंबरमध्ये होणार ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) मुदत संपलेल्या पन्नास ग्रामपंचायतीसाठी (Gram Panchayat) येत्या 18 सप्टेंबरला मतदान (voting) होणार असून आदर्श आचार सहिता काल पासून सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

राज्याची निवडणूक आयुक्त युपी एस मदान (Election Commissioner UP S Madan) यांनी काल निवडणूक जाहीर (Election announced) केलेल्या राज्यातील 608 ग्रामपंचायतींपैकी दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) 50 ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला. घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार (tahsildar) 18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस जाहीर करतील त्यानुसार नामनिर्देशन पत्र 24 ऑगस्ट ते एक सप्टेंबर रोजी स्वीकारण्यात येणार असून

2 सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी दोन सप्टेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सहा सप्टेंबर असून मतदान (voting) दि. 18 सप्टेंबर रोजी होणार असून त्याची मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानुसार ज्या तालुक्यात कमी पाऊस (rain) होतो. त्यामध्ये निवडणुका जाहीर केल्या आहे.

निवडणूक (election) कार्यक्रमाच्या कुठल्याही टप्प्यात अतिवृष्टी (heavy rain) किंवा पूर परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी निवडणूक आयोगास देणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मोर्चेबांधणीस वेग आला आहे. त्यातच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सदस्य पदा बरोबरच ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक थेट पद्धतीने होणार असल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायत

आंबेगण, अंबानेर, करंजवण, खेडले, जानोरी, देवपाडा, मोखनळ वरवंडी, कोचरगाव, तळेगाव दिंडोरी, दहेगाव, निगडोळ,फोपशी भातोडे, मोहाडी, रासेगाव, धाऊर, अकराळे, आंबेवणी, उमराळेखुर्द, कृष्णगाव, कोराटे, जउळकेदिंडोरी, देवपूर, देवठाण, राजापूर, वरखेडा, शिवनई, टिटवे, कसबेवणी, तळ्याचापाडा, पळसविहीर, पिंपळणारे, मडकीजांब, मुळाणे, खतवड, माळेगाव का., देहरे, पिंपरखेड, जुनेधागूर, नळवाडी, धोंडाळपाडा, ढकांबे, जांबुटके, कवडासर, चारोसे, नळवाडपाडा, झार्ली, देवघर, शिवारपाडा आदी.

- Advertisment -

ताज्या बातम्या