शिंदे गटात येण्यासाठी तब्बल ५० कोटींची ऑफर; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

शिंदे गटात येण्यासाठी तब्बल ५० कोटींची ऑफर; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई । Mumbai

शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (mahavikas aaghadi government) अल्पमतात आले आहे. बंडखोरीमुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता कन्नडचे (Kannada) आमदार (MLA ) उदयसिंग राजपूत (Uday Singh Rajput) यांनी खळबळजनक दावा केला आहे...

यावेळी बोलतांना राजपूत म्हणाले की, मला एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी ५० कोटींची ऑफर देण्यात आली होती. तसेच माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही आहे. मात्र मी गद्दारी केली नाही, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवसेना (shivsena) यांच्याबाबत कोणकतीही गद्दारी करणार नाही. अगदी १०० कोटी दिले तरी मी गद्दारी करणार नाही,' असे त्यांनी सांगितले. तसेच आमदार उदयसिंग राजपूत यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज सकाळपासून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री (Minister of Higher and Technical Education) उदय सामंत (uday samant) हे देखील नॉट रिचेबल असून ते सुरतवरून (surat) गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com