राज्यातील ५० अंगणवाड्या खासगी संस्थांना दत्तक

राज्यातील ५० अंगणवाड्या खासगी संस्थांना दत्तक

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

लोकसहभागातून अंगणवाडी केंद्रे (Anganwadi Centres )बळकट करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यासाठी दत्तक अंगणवाडी योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत बुधवारी राज्यातील ५० अंगणवाड्या खासगी संस्थांना दत्तक (50 Anganwadis in the state have been adopted by private institutions )देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. अंगणवाडी दत्तक घेणाऱ्या संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित जनकल्याण समितीचा समावेश आहे. या समितीला १२ अंगणवाड्या मिळाल्या आहेत.

अंगणवाडी केंद्र दत्तक देण्यासाठी आज महिला आणि बालकल्याण विभाग आणि जनकल्याण समिती, युनायटेड वे मुंबई, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट, भव्यता फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्यामध्ये आज झालेल्या सामंजस्य करार करून त्या अंतर्गत ५० अंगणवाड्या दत्तक देण्यात आल्या आहेत. यामुळे या अंगणवाड्यांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे, असे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha )यांनी यावेळी सांगितले.

या करारानुसार पुढील १० वर्षांसाठी सरकारला सहाय्य करण्यासाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत. जनकल्याण समिती मुंबईतील १२ अंगणवाड्या, युनायटेड वें मुंबई कर्जत मधील वीस अंगणवाड्या, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी वडाळा मधील तीन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट यांनी पश्चिम उपनगर येथील पाच, भव्यता फाउंडेशन यांनी मुंबई उपनगर घाटकोपर येथील पाच अंगणवाड्या, लायन्स क्लब ऑफ जुहू यांनी मुंबई उपनगरातील पाच अशा ग्रामीण आणि शहरी मिळून ५० अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत, अशी माहिती लोढा यांनी दिली.

दत्तक घेतलेल्या कालावधीत या अंगणवाड्यांचे नूतनीकरण, रंगकाम, फर्निचर, क्षमता वाढ, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची जबाबदारी देखील जनकल्याण समिती द्वारे घेण्यात येणार आहे. अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी ९०८२२६९०४४ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन लोढा यांनी केले.

तसेच राज्यातील प्रत्येक माता निरोगी राहून, लहान बालक सुदृढ ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. सक्षम राज्य निर्मिती होण्यासाठी अंगणवाडी केंद्र दत्तक घेणे ही सरकारची नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. या संकल्पनेला सर्वांनी पुढे नेण्यासाठी ‘चला अंगणवाडी दत्तक धोरणाला हातभार लावूया आणि महाराष्ट्र राज्याला एक सक्षम व सुदृढ पिढी देवूया, असेही लोढा म्हणाले.

यावेळी एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, राज्यात १ लाख १० हजार अंगणवाडी असून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्यांना स्मार्ट सुविधा देण्यात येतात. याव्यतिरिक्त उर्वरित अंगणवाड्यांना अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत विकास करण्यासाठी हे धोरण राबवण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com