Photos # मोठी बातमी : बऱ्हाणपूर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू

मालवाहू आयझर वाहनाची ऑटो-रिक्षाला धडक
Photos # मोठी बातमी : बऱ्हाणपूर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू

बऱ्हाणपूर (Barhanpur) (संजय यावलकर) -

बऱ्हाणपूर (Barhanpur) जिल्ह्यातील इंदूर-इच्छापूर राज्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पुन्हा एकदा 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या रिक्षाला आयशर वाहनाने धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षातील तीन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी ऑटो रिक्षाने स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या दिशेने येत होते. तेव्हा विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने येणार्‍या आयशर वाहनाने ऑटोला धडक दिल्याने ऑटोमधील विद्यार्थी अपघाताचे बळी ठरले. या अपघातात 3 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी बऱ्हाणपूर (Barhanpur) जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्याचबरोबर इतर जखमींनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी बंबरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com