झारखंडमध्ये 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली | New Delhi

झारखंड (Jharkhand) च्या चतरा येथून मोठी बातमी हाती येत आहे. सीमा सुरक्षा दल (Border Security Force) आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.

झारखंडच्या चतरा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेजवळ ही चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्याबरोबरच काही साहित्य सुरक्षा दलाने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

झारखंडच्या सीमा सुरक्षा दलाने पलामू-चतरा सीमेवर (Palamu-Chatara border) नक्षलविरोधी अभियान (Anti-Naxalite campaign) सुरु केले आहे. या अभियानादरम्यान सोमवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

LSG vs CSK : लखनऊ सुपरजायंट्ससमोर आज चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान, कोण मारणार बाजी?

या चकमकीमध्ये असलेला स्पेशल एरिया कमिटीचा कमांडर गौतम पासवान, अजीत उरांव उर्फ चार्ली यांच्यासह अमर गंझू, नंदू आणि संजीत भुइया यांना ठार केले. ठार करण्यात आलेल्या गौतम पासवान आणि चार्ली (Gautam Paswan and Charlie) या दोघांवर प्रत्येकी 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते; तर अन्य नक्षलवाद्यांवर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांना ठार करण्यात आज पोलिसांना यश आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्याबरोबरच इतर साथीदारांना शोधण्यासाठी जंगलात पोलिसांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. घटनास्थळावरुन दोन एके ४७ सह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *