परिवहन भ्रष्टाचार चौकशीला ५ दिवसांची मुदतवाढ - पोलीस आयुक्त दीपक पांडे

उपसचिव साबळे, तक्रारदार पाटलांचे जबाब पूर्ण
परिवहन भ्रष्टाचार चौकशीला ५ दिवसांची मुदतवाढ -  पोलीस आयुक्त दीपक पांडे
USER

नाशिक । प्रतिनिधी

राज्य परिवहन विभगातील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी मंगळवारी (दि.1) परिवहन विभागाचे उपसचिव प्रकाश साबळे तसेच तक्रारदार पाटील यांचा अपूर्ण राहिलेले जबाब काल नोंदवण्यात आले. यामुळे आता 13 जणांचे जबाब पूर्ण झाले आहेत. मात्र या पुरावे तसेच जबाब यांची खातरजमा पोलीस करणार असल्याने चौकशी साठी 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले.

अधिकार्‍यांवर भ्रष्टाचार व मनी लॅड्रींगचे आरोप करणारे तक्रारदार गजेंद्र पाटील आज दुसर्‍या दिवशीही नाशिक पोलिसांच्या चौकशीला हजर राहिले. तसेच आरोप झालेले परिवहन विभागाचे उपसचिव प्रकाश साबळे यांची सायंकाळपर्यंत चौकशी सुरू होती. आजपर्यंत 9 अधिकारी 3 खासगी व्यक्ती व तक्रारदार अशा 13 जणांचे जबाब पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी नोंदवले आहेत.

परिवहन विभागात मोटार वाहन निरिक्षक म्हणून कार्यरत असणारे गजेंद्र तानाजी पाटील यांनी नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यास ई मेलद्वारे दिलेल्या तक्रारीत तसेच 24 मे रोजी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत गंभीर आरोप केले आहेत.

यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह उप परिवहन आयुक्त, उपसचिव, अवर सचिव, वर्धाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावर संघटीत भ्रष्टाचार, मनीलॅड्रींगचे आरोप करण्यात आले आहेत.

सर्व संघटीतपणे भ्रष्टाचार करत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा तसेच महाराष्ट्र पोलीस यंत्रणा कुचकामी असल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी असेही पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, आज दुसर्‍या दिवशी पाटील यांनी काही पुरावे सादर केले. तसेच त्यांचा व उपसचिव साबळे यांचे जबाब पुर्ण झाले. आता पोलीस पुरावे तसेच नोंदवललेल्या जबाबांची फेरतपासणी करणार आहेत. गरज पडल्यास पुन्हा त्या अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. यामुळे चौकशीला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून यानंतर शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com