कराेना रुग्ण
कराेना रुग्ण
मुख्य बातम्या

देशात २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

४९ हजार रुग्ण वाढल्याने संख्या पाेहचली १३ लाखावर

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली। New Delhi

देशात मागील २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० करोनाबाधित (Corona) रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. यामुळे देशात कराेना रुग्णांची संख्या अाता १२ लाख ८७ हजारावर गेली अाहे. तसेच कराेनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३० हजारावर पाेहचली अाहे.सलग दुसऱ्या दिवशी कराेना रुग्णांमध्ये माेठी वाढ झाली अाहे. गुरुवारी ४५ हजार ७२० रुग्ण अाढळून अाले हाेते. गुरुवारी देशात ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांत दहा लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यातील गेल्या २४ तासांत सुमारे साडेतीन लाख चाचण्या करण्यात आल्या. तसेच आता रोज जवळपास चार लाख चाचण्या करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएमआर’चे माध्यम समन्वयक लोकेश शर्मा यांनी सांगितले.

देशभरात करोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात आतापर्यंत ८,१७,२०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४,४०,१३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com