दिंडोरीत 'या' कंपनीचे ४७ कामगार 'पॉझिटिव्ह'

दिंडोरीत 'या' कंपनीचे ४७ कामगार 'पॉझिटिव्ह'

दिंडोरी | दि. 29 प्रतिनिधी Dindori MIDC

लखमापुर एमआयडीसीत पत्रे बनवणार्‍या एव्हरेस्ट कंपनीत तब्बल 47 कामगार करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दिंडोरी शहरात करोनाचा पुन्हा एकदा एमआयडीसीमुळे शिरकाव झाला असुन दिंडोरीत आता सहा रुग्ण वाढले आहेत.

दिंडोरी तालूक्यातील कंपन्यामध्ये करोनाचा संसर्ग कामगारांना होऊ लागला आहे. तालुक्यातील पालखेड एमआयडीसीतील हायमिडीया कंपनीत 44 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता एव्हरेस्ट कंपनीतही रुग्ण आढळले आहे.

एव्हरेस्ट कंपनीत सुमारे 47 रुग्ण पॉझिटिव्ह आले असुन या सर्वांना आता क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कंपनीत करोनाचा शिरकाव झाला असल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. अगोदरच शिवाजी नगरात बांधकाम व्यावसायिकाला करोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा दोन रुग्णांची भर पडली आहे.

वक्रतुंड नगर, निळवंडी रोड, शिवाजी नगर, लक्ष्मी नगर, घोरपडे अपार्टमेट येथे रुग्ण सापडल्याने आता खळबळ उडाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com