Monday, April 29, 2024
Homeदेश विदेश४३ टक्के भारतीयांचा चीनच्या उत्पादनावर बहिष्कार

४३ टक्के भारतीयांचा चीनच्या उत्पादनावर बहिष्कार

नवी दिल्ली

गेल्या वर्षी १५ जून रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्यातील संघर्ष झाला होता. यानंतर झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना हौतात्म्य आले. त्यानंतर चीनवरील राग व्यक्त करण्यासाठी ‘बायकॉट मेड इन चायना’ मोहीम देशात राबवण्यात आली होती. अनेक चिनी ऍपवर भारत सरकारने बंदी घातली होती. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर गेल्या वर्षभरात सुमारे ४३ टक्के भारतीयांना चायनिज उत्पादने खरेदी केलेली नाहीत, अशी माहिती एका सर्व्हेक्षणातून मिळाली आहे. ‘लोकल सर्कल’ ( LocalCircles) या सोशल मीडिया प्लॅटफॉमवरील संस्थेने ही पाहणी केली होती.

- Advertisement -

आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

एका वर्षात ४३ टक्के भारतीयांनी कोणतीही चिनी वस्तू खरेदी केलेली नाही, अशी माहिती अहवालातून देण्यात आली. गेल्या वर्षभरात ३४ टक्के नागरिकांनी केवळ एक ते दोनच चिनी वस्तू खरेदी केल्या. तर, १४ टक्के नागरिकांनी गेल्या वर्षभरात ३ ते ५ वस्तू खरेदी केल्या आहेत. तसेच ७ टक्के लोकांनी वर्षभरात ५ ते १० चिनी वस्तू खरेदी केल्या आहेत. सर्वेक्षणातील बहुतेक लोकांनी चिनी वस्तूंच्या खरेदीमागे कमी किंमती आणि पैशांची बचतीचे कारण दिले होते. त्यांची संख्या ७० टक्के असल्याचे सांगितले जाते आहे.

कसे झाले सर्व्हेक्षण

सर्व्हेक्षणात देशातील २८१ जिल्ह्यांतील १७ हजार ८०० लोकांचा समावेश होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असेच सर्वेक्षण केले होते, त्यानुसार ७१ टक्के लोकांनी त्यावेळी चीनमध्ये बनवण्यात आलेले कोणतेही सामान विकत घेतले नव्हते.

- Advertisment -

ताज्या बातम्या