पीककर्जासाठी 4,200 कोटींचा लक्ष्यांक

खरीपासाठी बँकांवर जबाबदारी
पीककर्जासाठी 4,200 कोटींचा लक्ष्यांक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पीककर्जावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सन 2023-2024 या खरीप हंगामाकरता विविध बँकांकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बँकांना पीककर्ज वाटपासाठी 4,200 कोटी रूपयाचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील शेतकर्‍यांकरता 1 एप्रिलपासूनच खरीप कर्जवाटपाला प्रारंभ झाला आहे. मात्र शेतकर्‍यांकडून अजून त्यास प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

सन 2022-23 साठी 4 हजार 16 कोटी लक्ष्यांक निर्धारित केला होता. त्यानुसार 31 802.5, ग्रामीण बँकांना 18 कोटी, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेला 615 कोटी याप्रमाणे लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी आपल्या जवळच्य शाखेत जाऊन पीककर्जासाठी अर्ज करण्याबाबतचे आवाहन अग्रणी बँकेकडून करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी पीककर्ज वाटपासाठी सर्वाधिक लक्ष्यांक सरकारी बँकांना देण्यात आला होता. मात्र, तो पूर्ण झालेला नसला तरी यंदा यात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा बँकेपुढे कर्जवसुलीचा मोठा प्रश्न असतानाच पुन्हा खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप करावे, लागणार असल्याने बँकेकडून त्यानुसार नियोजन केले जात आहे.

मार्चअखेर जिल्ह्यात 3426.57 कोटी पीककर्जाचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये सरकारी, खासगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी दिलेल्या उद्दिष्टांच्या जवळपास पीककर्जाचे वाटप केले. या बँकांनी एकूण पीककर्जाच्या लक्ष्यांकाच्या 85.32 टक्के इतके उद्दिष्ट साध्य केले होते. यावर्षी सन 2023-24 साठी 4200 कोटी रुपयांचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. सरकारी बँकांना 2764.8, खासगी बँकांना खरीप हंगामासाठी पात्र शेतकर्‍यांनी बँकेकडे त्वरित पीककर्ज मागणीसाठी अर्ज करावा, जेणेकरून खरीपपूर्व मशागतीसाठी आणि पेरणीसाठी बँकांकडून वेळेत कर्जपुरवठा करणे शक्य होईल, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेश पाटील यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com