Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना नेते यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या; कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या; कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

मुंबई | Mumbai

केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Govt) नेते अडचणीत आले आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असा संघर्ष या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे सुरु आहे.

- Advertisement -

दरम्यान शिवसेना (Sivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) केलेल्या कारवाईनंतर आता आयकर विभागाकडून (Income Tax Department) शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली आहे.

यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रेतील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.

यशवंत जाधव हे गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर होते. काही दिवसांपूर्वीच जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांनी मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या