कडक सुरक्षा व्यवस्थेत सर्व आमदार गुवाहाटीत पोहोचले

आमच्यासोबत ४० आमदार; आणखी १० आमदार सोबत येतील - एकनाथ शिंदेंची माहिती
कडक सुरक्षा व्यवस्थेत सर्व आमदार गुवाहाटीत पोहोचले

सुरत l वृत्तसंस्था

आमच्यासोबत सद्यस्थितीत 40 आमदार आहेत. आणखी दहा आमदार सोबत येणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

काल (दि २०) दिवसभराच्या राजकीय घडामोडींनंतर आज प्रथमच शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते.

यापुढे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार कशा पद्धतीने पुढे जाईल आणि एकनाथ शिंदे यांची पुढील भूमिका कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, सर्व आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. कडक सुरक्षा व्यवस्था याठिकाणी ठेवण्यात आली आहे. रॅडीसन ब्ल्यू नावाच्या हॉटेलमध्ये या सर्व आमदारांना ठेवण्यात आले आहे.

दुसरीकडे, राज्य सरकारकडून कुठलीही अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com