
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
सेनेगलमधील (Senegal) कॅफ्रीन (Cafrine) येथील ग्निवी भागात (Gnivi area) दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) घडला आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. त्यामुळे ४० जणांचा जागीच मृत्यू (Death) तर ८७ जण जखमी झाले आहेत.
रविवार (दि.८) रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असून राष्ट्रीय मार्ग क्रमांक १ वर हा अपघात घडला. तसेच जखमींना रुग्णालयात (Hospital)दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवली जात असून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेनंतर येथे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.