चार वर्षांच्या मुलीचा व्हि़डिओ प्रचंड व्हायरल : पंतप्रधानांनी केली कॉमेंट, म्हणाले...

चार वर्षांच्या मुलीचा व्हि़डिओ प्रचंड व्हायरल : पंतप्रधानांनी केली कॉमेंट, म्हणाले...

नवी दिल्ली

सोशल मीडियावर चार वर्षांच्या मुलीचा व्हि़डिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे खूप कौतुकही होत आहे. या गोंडस मुलीच्या व्हिडिओवर कॉमेट करण्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वत:ला रोखू शकले नाही.

मिझोराममध्ये. एस्थर नाम्ते नावाच्या एका चार वर्षाच्या चिमुरडीने अतिशय सुंदररित्या, बिनचूक वंदे मातरम् या गीताचं सादरीकरण केले आहे. तिने गायलेले गाणं सोशल मीडियावर चांगलंच हिट होतं आहे. तिचा व्हिडीओ मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी त्यांच्या ट्विटअर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिच्या गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एस्थर नास्ते आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केले आहेस".

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com