देशभरातील चार हजार 300 आमदार एका मंचावर येणार एकत्र

एमआयटीतर्फे राष्ट्रीय विधायक संमेलनाचे मुंबईत आयोजन
देशभरातील चार हजार 300 आमदार एका मंचावर येणार एकत्र

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

देशाच्या इतिहासामध्ये (country's history) प्रथमच देशातील 4300 आमदार (MLA) राष्ट्रीय विधायक संमेेलनामध्ये (National Constituent Assembly) एकत्रित येऊन (come together)एकाच व्यासपीठावर (same platform) विचार विनिमय (Exchange of ideas) करणार आहेत.देशभरातील सर्व विधानसभा (All assemblies) व विधानपरिषदेचे अध्यक्ष (President of the Legislative Council) व सभापती (Chairman) यांच्या सहकार्याने हे संमेलन (meeting) होत असल्याची माहिती रावेरचे आमदार शिरीष चौधरी,(Raver MLA Shirish Chaudhary,) आमदार राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole) व भुसावळचे आमदार संजय सावकारे (Bhusawal MLA Sanjay Savkare) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित राष्ट्रीय विधायक संमेेलन, भारत हे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटर मध्ये दि. 15 जून ते दि. 17 जून या दरम्यान होत असल्याने त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदारांनी हे माहिती दिली. या वेळी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद जळगावचे अध्यक्ष अजय पाटील, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद जळगावचे समन्वयक अभिजीत भांडारकर, रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे जिल्हा समन्वयक योगेश ब्रिजलाल पाटील आणि एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते.

गोलमेज परिषद होणार

राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसुत्रीचा प्रमुख उद्देश ठेऊन आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा उद्घाटन सोहळा दि. 16 जून रोजी होणार आहे. 17 जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. या व्यतिरिक्त 40 समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे.

माजी सभापतींची उपस्थिती

भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकुरकर, मनोहर जोशी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल कराड यांच्या विचार चिंतनामधून राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत ही संकल्पना साकारली आहे. ते संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com