वाडीवर्‍हेजवळ ट्रक- कार अपघातात चार जण ठार

बकरी ईदच्या दिवशी काळाचा घाला
वाडीवर्‍हेजवळ ट्रक- कार अपघातात चार जण ठार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुंबई आग्रा महामार्गावरील ( Mumbai Aagra Highway ) वाडीवाऱ्हे येथे दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर अनियंत्रित हाेऊन रस्त्याचे डिव्हायडर ताेडून समाेरुन येणाऱ्या कारवर आदळल्याने झालेल्या अपघातात ( Accident )नाशिकमधील चार तरुण जागीच ठार झाले. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, सर्व तरुण बकरी ईदचे नमाजपठण करुन नाशिककडे येत हाेते. गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

रिजवान इक्बाल कुरैशी (वय- ३०), जुबेर इक्बाल शेख (वय-३०), हुजेफ (साेनू)एजाज उस्मानी (वय-३१), साहेल अकिल पठाण (वय-२२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. मृत्यूमुखी पडलेले तरुण जुने नाशिकमधील चाैकमंडई, पखालराेड, वडाळ्यातील साईनाथनगर येथील रहिवासी आहेत. तर नदीम राैफ सैय्यद हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

एनएल ०१ एए १२४८ या क्रमांकाचा कंटेनर सायंकाळी साडेसहा वाजता नाशिककडून मुंबईकडे जात हाेता. वाडीवाऱ्हेच्या आसपास एक दुचाकीचालक महामार्गावरुन जात असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वरील कमटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कंटेनर डिव्हायडर ताेडून समाेरची लेन क्राॅस करुन इगतपुरीकडून नाशिककडे येणाऱ्या तरुणांच्या कारवर जाऊन आदळला.

दरम्यान पावसामुळे मदतकार्यात अडचणी आल्या. दि.२१ राेजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच नरेन्द्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मृत तरुणांमधील एकाचे रेडीअमचे, नंबरप्लेटचे दुकान असून दुसऱ्याचा कारमाॅल आहे. तर तिसरा किरकाेळ कामे करायचा. या घटनेने शहरावर शाेककळा पसरली आहे. याबाबत पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु हाेते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com