नवीन नाशिक
नवीन नाशिक
मुख्य बातम्या

करोनाग्रस्त मृत्यूंमध्ये नाशिक राज्यात चौथे

शंभर दिवसात जिल्ह्यात ३९० बळी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात तसेच नाशिक शहरात करोनाचा कहर सुरू असून आतापर्यंत 9 एप्रिल ते 20 जुलै या 100 दिवसांत 398 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील महिनाभरात दररोज सरासरी 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातनाशिक जिल्हा करोनाग्रस्तांच्या मृत्यू (Corona Deaths) बाबत चौथ्या क्रमांकावर आहे.

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील धोकाही वाढत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे या शहरांपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू आहेत. इतर शहरे तसेच जिल्हांचा नाशिकपेक्षा कमी मृत्यू दर आहे.

यामध्ये सर्वाधिक मुंबई 5 हजार 755, ठाणे 840, पुणे 1 हजार 192 यानंतर चौथ्या क्रमांकावर 398 मृत्यू नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यानंतर सोलापूर 389, औरंगाबाद 372 जिल्ह्याचा नंबर आहे.

29 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित आढळून आला. कोरोनाबाधितांची संख्या साडेनऊ हजारवर पोहोचली आहे.

यामध्ये दररोज सरासरी 300 रूग्णांची भर पडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संसर्ग वाढल्याने मृत्यूंचीही संख्या वाढली आहे.

तर त्यानंतर 111 दिवसांत 18 जुलै पर्यंत तब्बल 9 हजार 491 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच 9 एप्रिलला जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर शंभर दिवसांत म्हणजेच 20 जुलैपर्यंत 398 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पहिल्या 50 बाधितांचा मृत्यू 45 दिवसांत झाला होता.

त्यानंतर 15 दिवसांत पुढील 50 बाधितांचा मृत्यू झाला. तर पुढील 12 दिवसांत आणखीन 57 बाधितांचा मृत्यू झाला. मात्र 19 जून नंतर कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

9 एप्रिल ते 19 जून या कालावधीत जिल्ह्यात 153 बाधितांचा मृत्यू झाला होता. तर 20 जून ते 19 जुलै या 29 दिवसांच्या कालावधीत तब्बल 245 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील महिनाभरात जिल्ह्यात दररोज सरासरी 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तसेच मृत्यूमृखी पडलेल्यांमध्ये वृद्धांचा सर्वाधिक समावेश असून त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार, कर्करोग अशा समस्या देखील असल्याचे समोर आले आहे.

जिल्हानिहाय मृत्यू

क्षेत्र एकूण बाधित मृत्यू

नाशिक ग्रामीण 2243 90

नाशिक मनपा 5411 210

मालेगाव मनपा 1189 82

जिल्हाबाहेरील 178 16

एकूण 9021 398

Deshdoot
www.deshdoot.com