Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील धरणांत ३७ टक्के जलसाठा

जिल्ह्यातील धरणांत ३७ टक्के जलसाठा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जुलै संपत आला तरी शहर व जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा ओळखला जातो. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २४ धरणांत ३७ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण अवघे २७ टक्के इतके होते. यंदा काहिशी परिस्थिती समाधानकारक असली तरी पावसाने दडी मारल्यास परिस्थिती अवघड होऊ शकते.

- Advertisement -

गतवर्षी जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला होता. जुलै महिन्यातच गोदावरीला महापूर आला होता. गोदामाई दुथडी भरुन वाहत होती. ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरुन मोठया प्रमाणात विसर्ग सुरु होता. गंगापूर व दारणातून मोठया प्रमाणात विसर्गामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून ९३ हजार क्युसेस विसर्ग सुरु होता. बंधार्‍यातून तब्बल १२१ टिएमसी पाणी मराठवाडयाला गेले होते. १९ वर्षानंतर ५० टिएमसी क्षमतेचे गिरणा धरण शंभर टक्के भरले होते.

धरणातील मुबलक साठयांमुळे यंदा उन्हाळयात दुष्काळाच्या झळा जाणवल्या नाहित.अगदी डिसेंबर जानेवारीपर्यंत परतीचा पाउस सुरु होता. त्यामुळे धरणे पाण्याने भरली होती. यंदाच्या हंगामात अद्याप समाधानकारक पाउस झाला नाही. जुलै महिना संपत आला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी पेरण्या धोक्यात आल्या आहेत. पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्याना देखील समाधानकारक पाऊस झाला नाही.

उर्वरित सिन्नर, दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव,नांदगाव हे तालुके कोरडेठाक आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील धरणात ३७ टक्के पाणी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के पाणीसाठा जादा आहे. मात्र पुढिल काळात पावसाने पाठ फिरवल्यास परिस्थिती अवघड होऊ शकते. धरणातील पाण्यावरच पुढिल काळात पिण्याच्या पाण्यासह शेती व उद्योगधंद्यासाठी आवर्तनाचे भवितव्य ठरणार आहे.

धरणनिहाय पाणीसाठा (टक्केवारित)

गंगापूर ५२

कश्यपी २४

गौतमी गोदावरी २१

आळंदी ०

पालखेड ३०

करंजवण १८

वाघाड ९

ओझरखेड ४०

पुणेगाव ११

तिसगाव ९

दारणा ६३

भावली ७९

मुकणे २८

वालदेवी ३४

कडवा २१

नांदूरमध्यमेश्वर ८९

भोजापूर २२

चणकापूर २१

हरणबारी ६७

केळझर २१

नागासाक्या ३१

गिरणा ४०

पुनद ४७

माणिकपुंज ४८

- Advertisment -

ताज्या बातम्या