तीन बसेसची जोरदार धडक; ३७ प्रवासी ठार

तीन बसेसची जोरदार धडक; ३७ प्रवासी ठार

नवी दिल्ली | New Delhi

नायजेरियात (Nigeria) तीन बसेसची (Three Buses) जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) घडला असून या दुर्घटनेत ३७ प्रवासी ठार (killed) झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदुगुरी शहरात (Maiduguri City) हा अपघात घडला असून दुर्घटनाग्रस्त दोन्ही बस विरोधी दिशेने प्रवास करत होत्या. दोन्ही बस वेगात असताना एका बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या बसवर जाऊन आदळली. याचवेळी तिसऱ्या बसने अपघातग्रस्त बसेसना धडक दिली. तर बस वेगात असल्याने अपघातानंतर आगीचा (Fire) भडका उडाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com