करोनाबाधित
करोनाबाधित
मुख्य बातम्या

सिन्नरमध्ये विक्रमी ३७ करोनाबाधित आढळले

शहरात १८ तर ग्रामीण भागात १९ रुग्णांचा समावेश

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर | प्रतिनिधी

आज शनिवार १५ ऑगस्ट रोजी तालुक्यात विक्रमी ३७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील शहरात १८ तर ग्रामीण भागात १९ रुग्णांचा समावेश आहे.

शहरात रेणुका नगर ५५ वर्षीय पुरुष, करपे नगर ३६ वर्षीय पुरुष, मुरलीधर नगर ३६ वर्षीय पुरुष, अश्विनाथ नगर ४६ वर्षीय पुरुष, उद्योग भवन ३७ व ४० वर्षीय पुरुष, साई बाबा नगर ४२ वर्षीय पुरुष, पाचोरे गल्ली २६ वर्षीय पुरुष,

गणेश नगर ३५ वर्षीय पुरुष, क्रांती चौक ४८ वर्षीय पुरुष, कमल नगर ४० वर्षीय महिला, विजय नगर २० व १६ वर्षीय युवती, देवी रोड ३५ वर्षीय पुरुष, सरदवाडी रोड ५१ वर्षीय पुरुष, नायगाव रोड ४२ वर्षीय पुरुष, शहरातील गावठा भागात ४३ व ४६ वर्षीय पुरुषाचा यांचा त्यात समावेश आहे.

ग्रामीण भागात माळेगाव येथे ६ नवे रुग्ण आढळले असून त्यात ३० वर्षीय २ युवक, ३३, ३७ व ७४ वर्षीय पुरुष व २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजच्या अहवालात वडांगळीमध्ये ४ व मेंढी येथे २ रुग्ण आढळले आहेत.

वडांगळीत ४५ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, १० व १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. मेंढी येथे ४९ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय युवक, नायगाव येथे ५५ व ५८ वर्षीय महिला व ५ वर्षीय बालिका, गुळवंच येथे ५५ वर्षीय महिला व ३५ वर्षीय तरुण, सोनारी २९ वर्षीय महिला, मापरवाडी २६ वर्षीय युवक हे बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com