गुजरातमधून ३५० किलो ड्रग्ज जप्त; महाराष्ट्र कनेक्शन?

गुजरातमधून ३५० किलो ड्रग्ज जप्त; महाराष्ट्र कनेक्शन?

अहमदाबाद | Ahmedabad

गुजरातच्या (gujrat) द्वारकामध्ये (dwarka) तब्बल ३५० किलो ड्रग्ज (drugs) जप्त येऊन एका व्यक्तीला अटक (arrested) करण्यात आली आहे. त्या व्यक्तीकडे १७ किलो मेफेड्रोन आणि हेरोईन सापडल्याची माहिती मिळत आहे. हा आरोपी महाराष्ट्रातील (maharashtra) मुंब्र्याचा (mumbra) रहिवाशी असून तो भाजीविक्रेता आहे...

देवभूमी द्वारका पोलिसांनी (Police) ही करवाई केली आहे. आरोपीकडे सापडलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे ८८ कोटी २५ लाख रुपये आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १९ पाकिटे हस्तगत केली आहेत. याशिवाय आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४७ पाकिटे जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप व स्थानिक गुन्हे शाखेने एकत्र कारवाई करत शेहजाद घोषी या व्यक्तीला आराधना धाम येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत एकूण १९ पाकिटे सापडली. यात ११ किलो हेरोईन आणि ६ किलो मेफेड्रोन होते. याची एकूण किंमत ८८ कोटी २५ लाख इतकी आहे, अशी माहिती संदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

४४ वर्षीय आरोपी शेहजाद महाराष्ट्रातील ठाण्याचा रहिवासी आहे. तीन दिवसांपूर्वी तो खंभालिया येथे आला होता आणि आरती गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता. त्याची हालचाल संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. ड्रग्ज मिळाल्यानंतर पुन्हा ठाण्याला जाण्यासाठी तो बसची वाट पाहत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com