वादळी पावसाचा बिहारमध्ये हाहाकार; वीज पडून ३३ जण दगावले

फाईल फोटो
फाईल फोटो

बिहार । bihar

बिहारमध्ये (Bihar) प्रचंड उकाड्यानंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने ( unseasonal rains) अनेक जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. यात १६ जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने (lightning strike) ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत बिहारमधील एकट्या भागलपूर भागात (Bhagalpur area bihar) ७ लोकांचा वीज कोसळून मृत्यू (7 killed in lightning strike) झाला आहे. तर मुजफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur bihar) ६ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सारणमध्ये ३, लखीसरायमध्ये ३, मुंगेरमध्ये २, समस्तीपूर, जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहारमध्ये २ तर दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

तसेच या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. ईश्वर मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्विट मोदींनी केले आहे. तसेच राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासन मदत कार्य करत असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त करताना आर्थिक मदतीची (financial assistance) घोषणा केली आहे. तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून (bihar State Government) चार लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना तातडीने ही मदत मिळावी यासाठी वेगाने पंचनामे करुन ही मदत लवकरात लवकर पोहचवली जावी यासंदर्भातील निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com