नाशिक जिल्ह्यात 32 हजार रूग्णांची करोनावर मात

करोना मुक्तीचे प्रमाण 80 टक्क्यांवर
नाशिक जिल्ह्यात 32 हजार रूग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरत तसेच जिल्हात करोनाचा प्रादुर्भाव सुरू असला तरी दिवसेंदिवस करोनामुक्त होणार्‍या रूग्णांचेही प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 136 रूग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर..

हे प्रमाण एकुण 79.44 टक्केंवर गेले आहे. तर जिल्ह्यात निगेटिव्ह येणारांची संख्या 94 हजार 287 ंवर आहे. यामुळे मोठा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे.

गेली 24 तासात जिल्ह्यात 995 रूग्णांनी करोनावर मात केली. आहेत तर 1 हजार 307 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आतापर्यंतचा करोना पॉझिटिव्हचा आकडा 40 हजार 453 इतका झाला आहे. तर आज दिवसभरात 6 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 995 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामध्ये सर्वाधिक नाशिक शहरातील सर्वाधिक 697 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा 22 हजार 776 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 272 रूग्णांनी करोनावर मात केली आहेत. यामुळे ग्रामिण भागातील करोमुक्त होणार्‍या रूग्णांचा आकडा 7 हजार 164 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 23 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 2 हजार 3 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 229 झाला आहे. तर 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 307 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे करोना ग्रस्त होणारांचा आकडा 40 हजार 454 वर पोहचला आहे.

करोनामुळे दिवसभरात 6 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 नाशिक शहरातील तर 3 ग्रामिण भागातील आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 900वर पोहचला आहे. मात्र कालच्या तुलनेत मृत्युचा आकडा 11 ने कमी आहे.

करोनामुक्त होण्याची टक्केवारी एकुण 79.44 असून यामध्ये सर्वाधिक नाशिक शहरात 82.44 असे प्रमाण आहे.

करोनामुक्त रूग्ण असे

ठिकाण आकडेवारी टक्के

नाशिक : 22,671 82.36

मालेगाव : 1,947 73.06

उर्वरित जिल्हा : 7,181 73.45

जिल्हा बाह्य : 195 82.97

एकूण 32, 146 80.06

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com