जुन्या नाशिकमध्ये ३२ लाखांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त

जुन्या नाशिकमध्ये ३२ लाखांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त

नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशिक परिसरात आज सकाळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीत जवळपास ३२ लाखांची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे....

अन्न औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गोपीनिय माहितीच्या आधारे जुने नाशिक परिसरातील अमरधाम रोड कठडा येथील उस्मानिया ट्रेड मधील गोडाऊनमध्ये कारवाई करण्यात आली.

यादरम्यान, दस्तगिर उस्मान शेख नामक संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. सुगंधित तंबाखू, बंदी असलेला एकूण 31 लाख 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस 328 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीररित्या गुटखा किंवा तत्सम पदार्थ जर कुणी विक्री करताना आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सहायक आयुक्त गणेश परळीकर यांनी केला आहे. वरील कारवाई गुप्त वार्ता विभाग अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com