Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याप्रेयसीने पेटवून दिलेल्या 'त्या' युवकाचा मृत्यू; व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ

प्रेयसीने पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा मृत्यू; व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देवळा (Deola) तालुक्यातील लोहोणेर (Lohoner) येथे प्रेम प्रकरणाच्या वादातून रावळगाव (ता.मालेगाव) (Rawalgaon Tal Malegaon) येथील मुलीने आपल्या कुटूंबियांच्या मदतीने मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या युवकाचा अखेर मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात (District Civil Hospital) त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. व्हेलेंटाईन डेच्या (Valentine day) दिवशी अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे….

- Advertisement -

याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला जात आहे. लोहोणेर (Lohoner) येथील युवक गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षापूर्वी रावळगाव ता.मालेगाव (Rawalgaon Tal Malegaon) येथील युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबध निर्माण झाले. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तीचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते.

दरम्यान, या युवतीचा विवाह मोडला होता. यानंतर हा विवाह गोरख यानेच मोडल्याचा संशय युवतीच्या घरच्यांना होता. यानंतर शुक्रवारी (दि ११) युवतीसह तिचे कुटुंबीय लोहोणेर (Lohoner) येथे येवून या युवकाच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करुन मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते.

या घटनेत गोरख बच्छाव (Gorakh Bachhav) हा सुमारे ८५ टक्के भाजला होता. त्यावर सुरुवातीला देवळा ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार (Deola PHC) करुन पुढिल उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) हलविण्यात आले होते.

मात्र, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना या युवकाचे निधन झाले. देवळा पोलिसांनी (Deola Police) मुलगी कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३) वडिल गोकुळ सोनवणे (वय ५७),आई निर्मला सोनवणे (वय ५२), भाऊ हेमंत सोनवणे (वय३०) व प्रसाद सोनवणे (वय १८), यांना ताब्यात घेतले असून उद्या (दि १५) पर्यंत पाचही संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या