शाळेत बेछुट गोळीबार; ३१ जणांचा मृत्यू

शाळेत बेछुट गोळीबार; ३१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

थायलंडमधील (Thailand) पूर्व परिसरात एका माथेफिरूने शाळेमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार (Indiscriminately Firing) केल्याने ३१ जणांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमधील डे केयर सेंटरमध्ये (Day Care Center) ही घटना घडली असून यामध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हल्ला केलेला आरोपी माजी पोलीस (Police) असून गोळीबारानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याचे समजते.

दरम्यान, या आरोपीने गोळीबाराबरोबरच आपल्याजवळील चाकूनेही लहान मुलांवर हल्ला केला. तसेच गोळीबारात अनेक चिमुरड्यासह वृद्ध नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com